पवारांच्या वक्तव्यावर आणि अन्वरांच्या राजीनाम्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले?

औरंगाबाद | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर आणि तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे नेेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचिट दिलेली नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करत असतात, असे सांगत तारिक अन्वर यांची आम्ही समजूत काढू, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी राफेल प्रकरणात मोदींची पाठराखण केला असा आरोप करत तारिक अन्वर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मी लढाईसाठी तयार; तनुश्री दत्ताचं नाना पाटेकरांना आव्हान

-मी इतका नीच माणूस आहे का?- नाना पाटेकर

-छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना हिसका दाखवा- चित्रा वाघ

-महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिल्यामुळे शिवसेना आक्रमक; दिली केरळ बंदची हाक!

-तुमच्या आशिर्वादामुळे मी सुखरूप आहे; प्रितम मुंडेंचं कार्यकर्त्यांना पत्र!