“मला राजकारणाची किंवा मंत्रीपदाची परवा नाही, फक्त..”; शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज 15 जुलैरोजी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. काल त्यांनी बारामती येथील सभेत अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी गंभीर आरोप केले होते.

या आरोपांनंतर त्यांनी आज सकाळी पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत खुलासा केला.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

आज सकाळीच मी शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी सवा दहा वाजता अपॉईंटमेंट न घेता गेलो. मात्र, त्यावेळी ते झोपले होते. मग ते उठले आणि त्यांनी मला बोलवलं. ते तब्येत बरी नसल्याने बिछान्यावरच बसले होते. आम्ही दीड तास चर्चा केली. मी कुठलंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री, किंवा नेता म्हणून आलो नाही, असं मी त्यांना म्हटलं.

“महाराष्ट्रात ओबीसी यांना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाचे हॉटेल असले तर, तिथे जात नाही. तर, ओबीसीचे जिथे दुकान असतील त्या ठिकाणी मराठे जात नाहीत. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, राज्यातील ही परिस्थिती आता शांत करायची तुमची जबाबदारी आहे.” असं भुजबळ म्हणाले.

यावेळी त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरचा मुद्दाही उपस्थित केला. “विद्यापीठ नामांतरवेळीही राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यावेळी तुम्ही सरकार जे करेल ते करेल आपण ही परिस्थिती शांत करायला हवी, म्हणून पुढाकार घेतला होता. त्यावेळी तुम्ही सर्व परिस्थिती सांभाळली.  आताही तुमची जबाबदारी आहे.”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) शरद पवार यांना म्हटले.

“मुख्यमंत्री झालं म्हणजे सगळं कळतं असं नाही, तर..”

यावेळी शरद पवार यांनी जरांगे आणि सरकारमध्ये काय चर्चा झाली, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही, असं सांगितलं. तसंच जरांगे यांना कोणते मंत्री भेटले, त्यांना काय सांगितले हे मला काय माहीत नाही,असं पवार साहेब म्हणाले. त्यावर भुजबळ त्यांना म्हणाले की,  राज्यातले ज्येष्ठ नेते असल्याने तुम्हाला राज्याचा अभ्यास जास्त आहे. त्यामुळे तुम्ही आता यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्री झालं म्हणजे सगळं समजतं असं नाही. त्यांना राजकारणाचा अभ्यास जास्त आहे. त्यांना राज्यामधील अनेक गोष्टींचं जास्त अभ्यास आहे.  असं म्हणत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना आरक्षण प्रश्नी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.

तसंच पुढे भुजबळ म्हणाले की, “वाटलं तर, तुम्ही बोलवा आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत, असं मी साहेबांना म्हणालो. यावेळी पवार साहेबांनी नको म्हणत एक-दोन दिवसांत मीच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतो आणि काय होतंय आणि काय करता येईल, यावर मी चर्चा करायला तयार आहे. असं सांगितलं. यावर भुजबळ यांनी तुम्ही बोलवलं, तुम्ही सांगितलं तर सगळे येतील, असं शरद पवार यांना सांगितलं.

“वेळ पडली तर मी राहुल गांधींनाही भेटायला तयार”

तसंच पुढे भुजबळ म्हणाले की, “मला राजकारणाची किंवा मंत्रीपदाची परवा नाही, मला आमदारकीचीही चिंता नाही. फक्त या राज्यातील जातीवरून वाद आणि हा तणाव संपायला हवा. वेळ पडली तर मी विनंती करायलाही कमी समजणार नाही. सामाजिक प्रश्नांसाठी उद्या जर मला राहुल गांधी यांना भेटावं लागलं तर मी त्यांना ही भेटेले.”, असा भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

News Title- Chhagan Bhujbal statement after sharad pawar meeting 

महत्वाच्या बातम्या-

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

संभाजी राजेंवर गुन्हा दाखल होणार?, मोठी माहिती आली समोर

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंना भेटणार!

‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत

मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ