Chhagan Bhujbal l राज्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी अखेर आरक्षणावरून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. कारण आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळ या मुद्यावर स्पष्टचं बोलले आहेत.
भुजबळांनी आरक्षणावर केलं मोठं वक्तव्य :
यावेळी भुजबळ म्हणाले की, आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. तर आरक्षणाने एका वर्षात पाच वर्षात सर्व प्रश्न सुटत नसतात. तर आरक्षण दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं देखील नाही. तसेच आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिले असा भ्रम करून दिला जात आहे, पण तसं देखी काहीही नाही, असं छगन भुजबळ समता परिषदेच्या मेळाव्यात स्पष्टचं बोलले आहेत.
याशिवाय आपल्यासोबत दलित, मागासवर्गीय, मुस्लिम समाज आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजाच्या कार्यकर्ते आपल्यासोबत सुद्धा आहेत. त्यामुळे मतदारसंघात माझ्या निवडणुकीचं सारथ्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. तसेच सगळी माणसं आपल्यासोबत आहेत. महात्मा फुलेंना ब्राह्मणांनी मदत केली. तसेच एक-दोन नाही अनेक ब्राह्मणांनी मदतच केली आहे, पण काही लोकांची मनोवृत्ती ती कोती असते. परंतु, थोडेतरी लोक त्यात समजदार असतात, काय चूक आहे ते त्यांना नक्कीच समजतं असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal l आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसत नाही? :
दरम्यान, महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शाळेला विरोध करणारे तुमच्या आमच्यातील देखील होते. पण आपल्याला शाळेला जागा देणारे ब्राह्मण समाजाचे देखील लोक होते. त्यामुळे आपले दुश्मन सर्वच नाहीत. तर आमच्या विरोधात, आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यांना आपला पूर्णपणे विरोध आहे. तसेच ज्यांना समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे, त्यांना विरोध आहे, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे .
तसेच दलित, आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. मात्र कितीतरी दलित समाजाचे, आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर तुम्हाला सापडतील. पण झोपडपट्ट्यात गेले तर फक्त दलित आणि आदिवासीच सापडतात. पण असा एक भ्रम करून दिला आहे की, कोणत्याही समाजाला आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसणार का? मात्र असं होतं असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.
News Title –Chhagan Bhujbal statement on reservartion
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?
“अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला”, भुजबळ समर्थकांची जोरदार बॅनरबाजी
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका!
काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट
भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?