अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…

Chhagan Bhujbal | सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला. याला राज्यातून आता विरोध करण्यात आला आहे. काल परवा महाडच्या चवदार तळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केली. तेव्हा मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना त्यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाटलं गेलं. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. यामुळे कालच जितेंद्र आव्हाड यांनी माफी देखील मागितली आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बाजू घेतली आहे.

कालपासून मनुस्मृतीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. सरकारने मनुस्मृतीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करू नये यासाठी राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे. काल मनुस्मृतीचं पोस्टर फाडताना त्यांनी अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं. मात्र अशातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आव्हाडांबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाडांची भूमिका चांगली होती. फोटो फाटल्याबद्दल त्यांनी माफी मागितली, याप्रकरणामुळे भुजबळ यांनी पडदा टाकण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेने महाडला गेले होते. त्यांच्या हातून चुकून फोटो फाटला गेला. त्यांनी यानंतर माफी देखील मागितली आहे. आपण यामागची त्यांची भावना देखील समजून घ्यावी, असं तरी मला वाटतं, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात काहीही हरकत नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचे चंचूप्रवेश नकोय, या मुद्द्यावरून लक्ष विचलित होईल, त्यानंतर फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावर लक्ष केंद्रीत होईल, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

“मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको”

बहुजन समाजातील दलित, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, महिला आणि मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे आहेत, त्या सर्वांनी मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपलं लक्ष भलत्याच ठिकाणी केंद्रीत होईल, असं भुजबळ म्हणाले आहेत.

मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी सरकाने निर्णय घेतला आहे. मात्र याला आता छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तसेच समता परिषदेने विरोध केला आहे. याचपार्श्वभूमीवर आव्हाड महाडच्या चवदार तळे येथे गेले असता तिथे हा प्रकार घडला.

News Title – Chhagan Bhujbal Support To Jitendra Awhad About Manusmriti News Update

महत्त्वाच्या बातम्या

‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

‘मनुस्मृती मनातून…’; प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं

डॉ. श्रीहरी हळनोरची मोठी कबुली; डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार