आता भुजबळ छो़डो आंदोलन झालं पाहिजे – राज ठाकरे

आता भुजबळ छो़डो आंदोलन झालं पाहिजे – राज ठाकरे

मुंबई | आता भुजबळ जोडो नव्हे तर भुजबळ छोडो आंदोलन झालं पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय. छगन भुजबळांच्या समर्थकांशी ते कृष्णकुंजवर बोलत होते. 

छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ सुरु केलीय. त्याअंतर्गत ते राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. राज ठाकरे यांच्याशीही त्यांनी यासंदर्भात चर्चा केली.

दरम्यान, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. मात्र तरीही राज यांनी छगन भुजबळ यांना आतापर्यंत जामीन मिळायला हवा, असं म्हटलंय.

Google+ Linkedin