Top News विधानसभा निवडणूक 2019

बाळासाहेबांच्या अटकेसाठी मला नाईलाजानं सही करावी लागली- छगन भुजबळ

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या निर्णयावर मला नाईलाजानं सही करावी लागली, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण आता संपलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असं आमचं त्यावेळी म्हणणं होतं. मात्र त्यावेळी आमच्या मताला फारशी किंमत नव्हती. एका वरिष्ठाच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेबांच्या अटकेसाठी हट्ट करणारा राष्ट्रवादीतील तो वरिष्ठ नेता कोण? याची चर्चा सुरु झाली होती. अर्थातच बाळासाहेबांसोबत राजकीय शत्रुत्व असलेल्या आणि तत्कालीन गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्याकडे त्यांचा अंगुलीनिर्देश होता.

दरम्यान, १९९९ च्या वचननाम्यात आम्ही श्रीकृष्ण आयोगातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानूसार मी गृहमंत्री झाल्यानंतर ती फाईल माझ्यापुढे आली आणि मला नाईलाजानं सही करावी लागली, असं छगन भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या