बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ

नाशिक | डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

4 जानेवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, छगन भुजबळांनी सांगितलंय. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आजपर्यंत आपण सर्वसाधारण रुग्णांसाठीच्या कोरोना संसर्गाची लक्षणे आणि गुणधर्म यावर आधारित आपली आरोग्य सेवाविषयक क्षमतावृद्धी केली आहे. बालकांच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लाटेची गुणधर्म आणि शक्यतांच्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतांची चाचपणी करुनच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा असं छगन भुजबळांनी सांगितलंय.

अर्धे विद्यार्थी 9 दिवस आणि उरलेले अर्धे 9 दिवस शाळेत येतील या पार्श्वभूमीवर केवळ 9 दिवसांसाठी शाळा सुरु करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत, असं यावेळी भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार”

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फोन

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’; कपिल सिब्बलांचा काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर

आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवा, नवी नांदी निर्माण करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More