नाशिक महाराष्ट्र

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

नाशिक | राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं. सरकारने राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी न दिल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं.  त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी थेट राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झालंय. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे. एका हाताने टाळी वाजत नाही, असं भुजबळ म्हणाले.

मी 1985 पासून विधानमंडळात आहे. मात्र असं कधीही घडलेलं मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यांनी नाव पाठवल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असंच होतं. 1995 साली काँग्रेसप्रणित राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदललं. तरी सुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. मात्र सध्या आमदारांच्या नियुक्ती पत्रावर सही करायला राज्यपाल  दिरंगाई करत आहेत. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं आहे, असं भुजबळांनी सांगितलं.

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला, असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

“पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर…”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या