नाशिक | गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मुद्दे गाजत आहेत. त्यात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजप नेते रावसाहेब (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून (NCP) समाचार घेण्यात आला आहे.
मला ब्राम्हण मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal ) यांनी टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री ब्राम्हण असावा की अन्य कोण हे ज्याचं बहुमत असेल त्यावर ठरेल. मात्र, सर्वांना सोबत घेऊन चालणारा मुख्यमंत्री असावा. सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा, असा टोला छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून त्याला अनेक चांगल्या वैचारीक परंपरा आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुख्यमंत्री असावा. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांचा विचार करणारा मुख्यमंत्री असावा. त्याने जनतेची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
काळजी घ्या! संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले…
राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
’14 तारखेला अनेकांचे मास्क उतरवणार’; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा
“आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे”
Comments are closed.