नाशिक महाराष्ट्र

सर्वसामान्यांसाठी छगन भुजबळांनी केंद्र सरकारकडे केली ही महत्त्वाची मागणी

नाशिक | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गरीब, गरजू नागरिकांना मोफत, स्वस्त अन्न धान्य दिले जात आहे. सध्याची परिस्थिती आणि निर्माण होणारी बेरोजगारी पाहता येणाऱ्या काळात ही मागणी अधिक वाढणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राला 10 टक्के कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

शुक्रवारी केंद्रीय अन्न नागरी नागरी पुरवठामंत्री राम विलास पासवान यांनी देशातील सर्व राज्यांमधील अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्र राज्याच्या वतीने भुजबळ यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड आहे, पण ते अन्न सुरक्षा योजनेत बसत नाहीत, अशा तीन कोटी लोकांना राज्य शासनाने स्वखर्चाने 21 आणि 22 रुपये दराने धान्य घेऊन त्याचे वितरण केले. शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजुंना अन्न सुरक्षा योजनेची नितांत गरज आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन महिन्याच्या कालावधीत प्रतिमहिना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वाटपाचे नियोजन पूर्ण झाले आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.

अन्न सुरक्षा कायद्यातील लाभार्थ्यांना वितरीत करून झाल्यानंतर जे 5 ते 10 टक्के अन्नधान्य वाचते आहे, त्याचे वितरण गरजूंना व्हावे यासाठी 10 टक्के शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यासाठी परवानगी द्यावी. डिजिटल वितरण प्रणालीच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक प्रणालीद्वारे अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून अधिक सक्षमतेने काम करता येईल, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला; ‘या’ चार मुद्द्यांवर चर्चा

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या