नाशिक | नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली.
नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, दिवाळीनंतर वाढत गेलेल्या रुग्णसंख्येमुळं नाशिक जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याचं नवं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही”
“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”
शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर
“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”
Comments are closed.