Chhagan Bhujbal | मुंबईत काल अवकाळी पावसाने धिंगाणा घातला. भलं मोठं होर्डिंग पडल्याने दुर्देवी घटना समोर घडली. त्या होर्डिंगखाली तब्बल 100 लोकं अडकले होते. त्यातील काहींना बाहेर काढण्यात यश मिळालं. तर काही त्यातच अडकून पडले. तर यामध्ये तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अवकाळी पावसाने जनजीवन वस्कळीत झालं. तसेच यावेळी सरकारनेच महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. जे होर्डिंग पडलं होतं. त्या कंपनीचे मालक आणि उद्धव ठाकरे (Chhagan Bhujbal) यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यावर भाजपने उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं आहे. मात्र आता अशातच महायुतीचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बोलले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलत असताना त्यांनी सरकार आमचं, महानगरपालिका आमची, याप्रकरणात उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असं म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सवाल केला आहे. या सवालाने मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. होर्डिंग असलेला कंपनीच्या मालकाचं नाव हे भावेश भिडे आहे. भावेश भिडे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आता भाजप नेते राम कदम यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर खापर फोडण्यात आलं. मात्र भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजून वक्तव्य केलं.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं मत मांडलं आहे. ते म्हणाले की, सरकार आमचं आहे. महानगरपालिका देखील आमचीच आहे. यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे? व्यवसायिक राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी येत असतात. कोणी मिठाई घेऊन येतं. तर कोणी फोटो काढतात. याचा काहीही संबंध नाही, उगाच यामध्ये राजकारणमध्ये आणू नये, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मुंबईत जाताना असे अनेक बेकायदेशीर होर्डिंग दिसतात. ते सर्व समांतर हवं होतं. त्यांचं वजन देखील अधिक आहे. हे सर्व अनधिकृत आहे. त्या होर्डिंगची चोकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी कशाला वेळ लावायचा? आता प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.
“शासन पाच लाख रूपये देईल? विषय संपला का?”
होर्डिंगमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय होता? शासन पाच लाख रूपये देईल? विषय संपला का? या प्रकरणाची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय.
निवडणुकीबाबत विचारलं असता त्यांनी मी ज्योतिषी नाही. आता 4 जूनला असा किती वेळ राहिला आहे. थोडा धीर धरा, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
News Title – Chhagan Bhujbal With Uddhav Thackeray About Unseasonal Rain In Hording Accident
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा
अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं
‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले
‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण