बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छगन भुजबळांविरोधात भूमिका घेणाऱ्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीकडून घरचा रस्ता

मुंबई | विधानसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांमुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून कारवाई करण्यात आली आहे.

माणिकराव शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदे नाराज होते. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात भूमिका घेत प्रचार केला होता.

छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांची ही पक्षविरोधी कृती लक्षात घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत पत्र जाहीर केले आहे. यात, विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, माणिकराव शिंदे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हणण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More