बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कितीही तुटून पडा, कितीही कडवट बोला पण शरद पवारांचा संयम कधी सुटणार नाही”

मुंबई | 2019 ला राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी घडामोड घडली होती. महाविकास आघाडीच्या (MVA Government) माध्यमातून तीन वेगवेगळ्या पक्षांना एकत्र बांधण्याचं काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी केलं होतं. याच शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आज राष्ट्रवादी पक्षातर्फे (NCP) साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या सक्रिय राजकीय काराकिर्दीवर नेत्यांनी यावेळी प्रकाश टाकला आहे.

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) यांनी पवार यांचं राजकारण जवळुन पाहिलं आहे. आपल्या भाषणादरम्यान भुजबळ यांनी पवार यांच्या काही महत्त्वाच्या कामांचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांनी विरोधी पक्ष भाजपला देखील इशारा दिला आहे. पवार साहेबांवर खूप वैचारिक हल्ले झाले पण त्यांनी कायम संयम ठेवला. संयम बाळगण्याच्या बाबतीत त्यांची ख्यातीच आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

कितीही तुटून पडा, कितीही कडवट बोला पण त्यांचा संयम कधी सुटणार नाही. कितीही संकटं येऊ दे, मग ती शारीरिक असो वा राजकीय, साहेबांचा संयम कधी ढळलेला नाही.पवार साहेब तरुणांना लाजवेल अशा जिद्दीने काम करत आहेत. देशामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. देशामधील मोठमोठे नेते आणि विरोध पक्षातील नेते हे पवार साहेबांकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, असं भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा नेता मानलं जातं. आपल्या काराकिर्दीत पवार यांनी अनेक राजकीय भूमिका साकारल्या आहेत. शरद पवार यांना एक चतुरस्त्र राजकारणी मानलं जातं.

थोडक्यात बातम्या 

“राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे नेते म्हणजे शरद पवार”

धक्कादायक! एकाच दिवसात घेतली तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना लस

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपत नाही”

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More