सोलापूर | मराठा समाज आपल्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. आज सोलापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. वारी सुरळीत व्हावी असं वाटत असेल तर मुख्यमंंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये. मराठा समाजाची फसवणूक करून याल तर उद्रेक होईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
आंदोलनामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, चक्का जाम आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
#मराठा_क्रांती_ठोक_मोर्चा#मराठा_आरक्षण
सोलापुर मराठा मोर्चा चक्का जाम आंदोलन pic.twitter.com/Jf8HFXu7Ql— Golekar Ganesh N. (@golekarganesh) July 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली
-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन
-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
-पुण्यात दोन मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरु
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत