मनोरंजन

तानाजी vs छपाक: बाॅक्स ऑफीसवर कुणाची जास्त कमाई?

मुंबई | अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या छपाक चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अभिनेता अजय देवगण याचा ‘तानाजी: द अनसंग हिरो’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बाॅक्स ऑफीसवर कोणता चित्रपट बाजी मारतो याबाबत उत्सुकता होती.

छपाकने पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई केली आहे तर तानाजी चित्रपटाने 18 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या तरी अजय देवगण दीपिकाला भारी पडत असल्याचं दिसत आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समर्थनात उतरल्याने दीपिकाला बरीच टीका सहन करावी लागली. तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी अनेक नेटकऱ्यांनी केली होती. तसेच #boycotchhapak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला होता.

दरम्यान, छपाक चित्रपटाच्या निर्मितीसाठी 35 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तर तानाजी हा अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जनतेसाठी झटणार, उतणार नाही मातणार नाही; धनंजय मुंडेंचं भावूक ट्विट

तानाजी सावंतांना मदत करणाऱ्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

“आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या