मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. मास्क, सॅनेटायझर यांसारख्या वस्तूंची विक्री देखील चढ्या दराने होत आहे. मात्र आता कोरोनासाठी वापरणाऱ्या मास्कवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापण्यात आल्याचं आढळून आलं आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी विविध मास्क वापरले जात आहे. परंतु एका मास्कचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमधील मास्कवर शिवाजी महाराज यांचा फोटो असून बाजूला जगदंब असं लिहिण्यात आले आहे
या मास्कचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ज्याच्यावर महाराजांचा फोटो आहे अशा प्रकारचे मास्क विकत घेऊ नका असं आवाहन देखील शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
व्हा लखपती! कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका….; नरेंद्र मोदींचं ट्वीट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व दुकानं उद्यापासून बंद, पण ‘या’ 4 वस्तूंची दुकानं राहणार उघडी
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर
“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”
Comments are closed.