Top News महाराष्ट्र मुंबई

रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!

Photo Credit- Facebook/ Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

मुंबई | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळ नुकताचं पार पडला. यानिमित्ताने महाराजांचे 13 वे वंशज राज्यसभा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडाला वर्षभरात लाखो शिवभक्त भेट देत असतात. शिवभक्तांना राजसदरेवर जाऊन महाराजांपुढे नतमस्तक होता यावं, यासाठी रायगडच्या राजसदरेवरील बँरिकेट्स पुरातत्त्व खात्याच्या सहमतीने हटवण्यात आले आहेत.

संभाजीराजेंच्या या उपक्रमामुळे शिवभक्तांना महाराजांच्या सदरेपर्यंत जाऊन महाराजांचं दर्शन घेता येणार आहे. मात्र डाव्या बाजूने सदरेवर जाऊन उजव्या बाजूने उतरणे, महाराजांच्या तख्ताच्या जागेपर्यंत न जाणे, सेल्फी न काढणे, सदरेवर शांतता राखणे, या गोष्टी प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत. तरचं महाराजांचे आणि त्यांच्या सदरेचे पावित्र्य अबाधित राहिलं असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

अनेकांकडून रायगडाची कळत नकळत विटंबना होते. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत रायगडावर कोणकोणत्या नियमांचे पालन शिवभक्तांनी करावं याची नियमावली जारी केली आहे. राजसदरेवर जाऊन शिवभक्तांना आता महाराजांचं दर्शन घेता येणार आहे. मात्र सदरेवर जात असताना शिवभक्तांनी त्या जागेचे पावित्र्य जपावे असं आवाहनही यावेळी संभाजीराजेंनी केलं आहे.

दरम्यान, रायगडाच्या सदरेवर असणाऱ्या बँरिकेट्समुळे गेली अनेक वर्षे शिवभक्तांना महाराजांच्या राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येत नव्हतं. हे बँरिकेट्स हटवण्यात यावे अशी मागणी शिवभक्तांकडून होत होती. या मागणीला आज अखेर युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यामुळे यश प्राप्त झालं आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!

राज्य सरकारमधील ‘या’ नेत्यांवर कारवाई का होत नाही?- भाजप

…तोपर्यंत पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही- अनिल देशमुख

‘पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत संबंधितांवर कारवाई करा’; मुख्यमंत्री ‘अ‌ॅक्शन’मोडमध्ये

तरीही सर्वांना पुरून उरले, तो वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच तर ती 23व्या वर्षी उपसरंच बनली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या