‘छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून…’, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर हे पहिलंच हिवाळी अधिवेशन होतं. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली.

अजित पवार म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण पूर्णपणे राजकीय होते. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केलं आहे, यातून बाहेर पडलं पाहीजे. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी ही संस्कृती पाळली. त्यामुळं शिंदेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहीजे.

महापुरूषांच्या झालेल्या अवमानाच्या मुद्द्यावरूनही पवारांनी शिंदेंना सुनावलं. पवार म्हणाले की, महापुरूषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत.

यावेळी पवार असंही म्हणाले की, आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. परंतु काही लोक त्यांना धर्मवीर म्हणतात. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून राज्य केलं नाही.

दरम्यान, एखादं-दुसरं सोडलं तर कोणत्याच नेत्यानं अधिवेशनात राजकीय भाषण केलं नाही, असं म्हणत पवारांनी शिंदेंच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-