‘मला उमेदवारी दिली असती तर..’; छत्रपती संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
अहमदनगर | राज्यसभेवेळी मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये हे घडलंच नसतं, असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना केलं.
एकनाथ शिंदे यांची खदखद आधीपासूनच होती. आता त्यांचा स्फोट झाला. आता जे चाललं आहे ते आपण सगळेच बघतो आहे. सरकार कोणचंही असावं फक्त ते चांगले असावं असं आम्हाला वाटतं, असं संभाजीराजे म्हणालेत.
मराठा आरक्षण गेलं त्यावेळी दंगलीपासून समाजात शांतता राखण्याचं काम मी केलं. गडकिल्ल्यांच्या संरक्षणाचं काम मी केलं. बहुजन समाजासाठीही काम केलं. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी त्यांच्यासमोर अनेक पक्ष, आघाड्या आल्याने माझं काम त्यांच्यासमोर शुन्य झांल, असंही ते म्हणालेत.
दरम्यान, महाविकास आघाडीने राज्यसभेवेळी छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारली होती. छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीवेळी अपक्ष म्हणून लढणार होते. यासाठी महाविकास आघाडीने त्यांना पांठिबा द्यावा, अशी मागणी केली होती. पण महाविकास आघाडीने याला नकार दिला होता.
थोडक्यात बातम्या
“…म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे”
शिवसेेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना!
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल
‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक
Comments are closed.