Top News महाराष्ट्र मुंबई

“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा न्यायालयात सुनावणी होती. मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. टीव्ही 9शी ते बोलत होते.

मराठा आरक्षण सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली याला राज्य सरकार दोषी असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. दीड महिन्यापूर्वी सरकारने कोर्टाला एक पत्रं दिलं होतं. त्यात योग्य त्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची विनंती राज्य सरकारने कोर्टाला केली होती. तेव्हा घटनापीठाची मागणी केली नसल्याचं संभाराजेंनी म्हटलं आहे.

हे प्रकरण या खंडपीठाकडे आले असून हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावं असं राज्य सरकारने कोर्टाला सांगितलं. हे प्रकरण घटनापीठाकडेच जावं अशी सर्वांचीच मागणी आहे. पण दीड महिन्यापूर्वीच सरकारने ही मागणी का केली नाही?, असा सवाल राजेंनी सरकारला केला आहे.

दरम्यान, आज ही मागणी करून सरकारने दीड महिना वाया घालवला असून हा समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरानाची लागण

मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली

गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप

FAU-G गेमचा टीझर लाँच, नोव्हेंबरमध्ये येणार भारतीयांच्या भेटीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या