बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमरण उपोषण नक्की कशासाठी?; छत्रपती संभाजीराजेंनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

मुंबई | काही दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी 26 फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. त्यातच आता संभाजीराजे यांनी हे आमरण उपोषण नेमकं कोणत्या कारणांसाठी असणार आहे?, यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. मराठा आरक्षण मिळवणे हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दीष्ट असले तरी ती एक दिर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे, असं संभाजी महाराजांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करावं. मराठा आरक्षणासाठी अपेक्षित न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक निर्णय शासनाने गांभिर्याने घेवून पुढील कार्यवाही सुरू करावी, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण ही दिर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होई नये यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी माझा हा लढा आहे, असं संभाजी महाराज म्हणाले आहेत. ESBC आणि SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, परंतु, ज्यांची अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची ज्या पदावर निवड झालेली आहे. त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, अशी मागणी संभाजी महाराजांनी केली आहे.

दरम्यान, सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करून सारथी संस्थेचे सबलीकरण करावे. येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पामध्ये सारशी संस्थेसाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशा मागण्या संभाजीराजेंनी केल्या आहेत. राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता मी उपोषणास बसत आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, मुंबई बाहेरही राज्य आहे, “

Corona: 12 वर्षांवरील मुलांसाठी आता ‘या’ लसीला मंजुरी

Weather Update: पुढील 3 दिवस ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

“कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत”

‘कसौटी जिंदगी की’ फेम ‘हा’ अभिनेता वयाच्या 44 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More