मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या- खासदार संभाजीराजे
मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात संभाजीराजे यांनी शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत 2018 सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे 2185 मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणं बाकी आहे, असं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलंय.
सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावं, असं संभाजीराजे म्हणालेत.
सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून, कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्याची ठोस भूमिका शासनाने ठेवावी, असं संभाजीराजे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता
इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री
अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!
हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू
मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ
Comments are closed.