HMPV Virus l सध्या चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत चालल्याचे समोर आले आहे. मात्र आता भारतातही या व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत. 6 जानेवारीला बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. मात्र आता महाराष्ट्रातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. मुंबईत एक तर नागपुरमध्ये एचएमपीव्हीची लागण झालेले दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडले यांनी याविषयी माहिती दिली आहे.
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर :
डॉ. पारस मंडले म्हणाले की, HMPV व्हायरस बाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे एचएमपीव्ही आजारासंदर्भात आरोग्य विभाग देखील अलर्ट मोडवर आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने गाईडलाईन दिले आहेत. मात्र HMPV हा व्हायरस नवीन नसून जुना आहे. त्यामुळे याबाबत चिंता करण्याची फारशी गरज नाही. तसेच डायबिटीस, लहान मुल, ज्येष्ठ नागरिक, हायपर टेन्शन असणाऱ्या रुग्णांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.
या व्हायरसची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला येत आहे. त्यामुळे रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या रुग्णांनी मास्क वापरणे देखील अत्यंत गरजेचे आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. याशिवाय योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. पारस मंडले यांनी सांगितलं आहे.
HMPV Virus l नागरिकांना समस्या असल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर संपर्क करा :
दरम्यान, यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील नागरिकांची काळजी घेत आहोत. तसेच या आजाराच्या संदर्भात कुठलेही लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच या व्हायरसचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
याशिवाय नागरिकांना काही अडचण व समस्या असल्यास आरोग्य विभागाच्या टोल फ्री 240-2331572 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच नागरिकांनी या व्हायरसमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. पारस मंडले यांनी सांगितले आहे.
News Title : chhatrapati sambhajinagar alert mode due to the hmpv virus
महत्वाच्या बातम्या –
नागपूर शहरातील पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार
आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार
पुण्यात कुत्र्यांच्या तोंडात मृतदेहाचा तुकडा?; पालिका म्हणते, ‘तो तर पावाचा तुकडा!’
राज्यातील ‘या’ भागाला अवकाळी पावसाचा इशारा!
“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ