Chhatrapati Sambhajinagar Crime | छत्रपती संभाजीनगरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मैत्रिणीसोबत फिरताना पाहिल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या चेहऱ्यावर वार करून पोटात तब्बल १२ इंच चाकू खुपसण्यात आला. ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
नेमके काय घडले?
ऋत्विक कुलकर्णी हा उस्मानपुरा भागात आपल्या मैत्रिणीसोबत फिरत होता. याचा राग आलेल्या मैत्रिणीच्या मित्राने टवाळखोरांच्या मदतीने ऋत्विकवर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर दोन वार करण्यात आले आणि पोटात तब्बल १२ इंच चाकू खुपसण्यात आला. या हल्ल्यात ऋत्विक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
उस्मानपुऱ्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे
उस्मानपुऱ्यात महाविद्यालयीन युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याच भागात पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फ्लॅटमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या
ऐन संक्रांतीच्या दिवशी मित्र बाहेर गेल्यानंतर मारेकरी प्रदीप विश्वनाथ निपटे याच्या फ्लॅटमध्ये घुसले आणि त्याची गळा चिरून हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रदीप हा बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकत होता आणि तो संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील भाजीवालीबाई परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ आणि इतर तीन मित्रही राहत होते. मंगळवारी सायंकाळी सर्वजण कॉलेजमधून घरी परतल्यानंतर त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते. यावेळी प्रदीप एकटाच फ्लॅटवर थांबला. रात्री १० वाजता जेव्हा प्रदीपचा भाऊ आणि मित्र फ्लॅटवर परतले, तेव्हा प्रदीप गळा चिरलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडला होता. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
हत्येचे कारण अस्पष्ट; शनिवारी झालेल्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज
कॉलेजमध्ये झालेल्या वादानंतर प्रदीपची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रदीपची हत्या नेमकी कुणी आणि का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. प्रदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी होता. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
Title: Chhatrapati Sambhajinagar Crime Youth Attacked for Roaming with Girlfriend
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खानवरील हल्ल्यावर करिनाच्या EX बॉयफ्रेंडची मोठी प्रतिक्रिया
नवीन Hyundai Creta EV भारतात लाँच, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
सैफवरील हल्ल्यामागे शाहीदचा हात, पोलिसांच्या खुलाशाने खळबळ
सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फुटला; २४ कॅरेट ‘इतक्या’ हजारांच्या उंबरठ्यावर