युवा पिढीला रोजगार मिळणार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात औद्योगिक शहर वसणार

Industrial Cities l देशभरात दिवसेंदिवस बेरोजगारांच प्रमाण वाढत चाललं आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे युवा पिढी चिंतेंत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी देशभरात तब्बल 12 ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच बेरोजगारांची संख्या कमी होणार आहे.

12 नवीन शहर विकसित होणार :

देशाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ही मोठी योजना हाती घेतली आहे. याप्रकरणी वार्षिक बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी इन्फ्रा सेक्टरवर जास्त लक्ष केंद्रीत केले होते. तसेच अनेक नवीन महामार्ग, एक्सप्रेसवे तयार करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी हाती घेतला आहे. याशिवाय आता तब्बल 12 नवीन शहरांना औद्योगिक हब तयार करण्याचा निर्णय देखील लवकरच घेतला जाणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या 12 नवीन शहरांना औद्योगिक हब तयार करण्याचा शहरांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 8 शहरांचा समावेश करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांसाठी काम देखील सुरु झाले आहे. तसेच या वार्षिक बजेटमध्ये 12 नवीन शहरांचा समावेश आहे. यामुळे देशातील या 12 शहरांची लोकसंख्या देखील लवकरच 20 पर्यंत वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे..

Industrial Cities l सरकारने कामाला केली सुरवात :

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातंर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ग्रेएर नोएडा, धोलेरा यासह विविध राज्यातील 12 नवीन औद्योगिक शहरे स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश येथील दोन आणि बिहार येथील एका शहराचा समावेश आहे. या नवीन औद्योगिक शहरांमुळे त्या त्या राज्यातील रोजगार निर्मिती मध्ये देखील वाढ होणार आहे. तसेच अनेक नागरिकांच्या हाताला देखील काम मिळेल. याशिवाय इतर राज्यांवरील परप्रांतीयांचा देखील भार कमी होईल.

या 12 शहरांमधील चार शहरांमध्ये धोलेरा (गुजरात), ऑरिक (महाराष्ट्र), विक्रम उद्योगपुरी (मध्य प्रदेश) आणि कृष्णपट्टनम (आंध्र प्रदेश) मध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. या उद्योगांसाठी जागा वाटप देखील सुरु झाली आहे. तसेच इतर चार शहरांमध्ये पण सरकार पाणी, दळणवळण सुविधा, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तयार करण्याच्या कामाला लागले आहे.

News Title – Chhatrapati Sambhajinagar In Industry development

महत्त्वाच्या बातम्या-

महिलांना अशाप्रकारे घरबसल्या करता येणार पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार

नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट

फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

आज ‘या’ 3 राशींचा दिवस वरदानासारखा, सर्व इच्छा पूर्ण होतील!