Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam | महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल समितीत 21 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गाजत आहे. अखेर याच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंआहे. गेल्या दहा दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला दिल्लीत पोलिसांनी अटक केली. (Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam )
मुख्य आरोपी असलेला कंत्राटी लिपिक हर्षकुमार क्षीरसागर याला दिल्लीतून अटक झाली आहे. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जायच्या तयारीत आरोपी होता. त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. याचबरोबर आरोपीचे वडील अनिल क्षीरसागर आणि आई मनिषा क्षीरसागर यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला गुन्हे शाखेने मुंबईतून अटक केली होती.
क्रीडा संकुल समिती घोटाळ्यातील आरोपी अटकेत
कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याच्या शोधासाठी 8 पथके स्थापन केली होती. गेल्या वर्षी म्हणजेच मागच्याच महिन्यात 21 डिसेंबररोजी हा घोटाळा उघडकीस आला होता. कंत्राटी काम करणाऱ्या हर्षकुमारने संकुलनासाठी सरकारकडून मिळणारा कोटींचा निधी लंपास केला.11 महिन्यात त्याने सरकारला कोटींचा चुना लावला.
या सरकारी निधीतून त्याने फ्लॅट, महागड्या गाड्या,सोने आणि हीऱ्यांची दागिने खरेदी केले. तर गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी विमानतळा समोरील आलिशान एरियात 2 बीएचके लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला. इतकंच नाही तर त्याने परदेशातही जाऊन मौज-मस्ती केली. मात्र, हे प्रकरण उघड होताच त्याचे आई-वडील आणि स्वतः आरोपी फरार होते. अखेर त्याला दिल्लीतून अटक झाली. आरोपीच्या आई-वडिलांना देखील अटक करण्यात आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam )
लंपास केलेले पैसे मैत्रिणीवर उडवले
या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर व त्याची मैत्रीण देखील फरार होते. गुन्हे शाखेने हर्षकुमारची मैत्रिण आरोपी अर्पिता वाडकर हिला दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईतून अटक केली होती. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, अशात हर्षकुमारला देखील दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं. (Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam )
पोलिसांना हर्षकुमार याच्या फ्लॅटमध्ये एक पैसे मोजण्याची मशीन आढळून आली आहे. तसेच त्याच्याकडे सोने खरेदीच्या अनेक पावत्या देखील सापडल्या आहेत. तर, हर्षकुमार याने या घोटाळ्यामागे मास्टरमाइंड दुसरेच असल्याचा दावा केलाय. क्रीडा उपसंचालक संजय सबनीस आणि बँक मॅनेजर हेच घोटाळ्याचे मास्टरमाइंड असल्याचे त्याने म्हटले आहे.आता या प्रकरणी तपास सुरू आहे.
News Title : Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam update
महत्त्वाच्या बातम्या-
सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!
धक्कादायक! ‘तो’ प्रयोग होऊ नये म्हणून कराडने केलं आजारपणाचं सोंग?
“सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या”
झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट ठरते फायदेशीर!