आंतरधर्मीय मैत्री भोवली; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Student Kidnapped and Beaten for Inter-Religious Friendship 

Chhatrapati Sambhajinagar | बीड बायपास रोडवर (Beed Bypass Road) शनिवारी एका विद्यार्थ्याला आंतरधर्मीय तरुणीशी मैत्री केल्यामुळे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी, सातारा पोलिसांनी (Satara Police) अनास अकबर जलालुद्दीन शेख (वय २१, रा. बारी कॉलनी) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Chhatrapati Sambhajinagar)

नेमके काय घडले?

पार्थ संदीप सोनावळे (रा. सिडको वाळूज महानगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. त्याच्याच महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकणारे दोन विद्यार्थी त्याचा पाठलाग करत होते.

शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास, पार्थ आणि त्याचा मित्र प्रथमेश साळवे घरी परतत असताना, पाठलाग करणाऱ्या दोघांसह, आणखी तिघांनी सवेरा हॉटेलजवळ (Sawera Hotel) त्याची दुचाकी अडवली. तिथे आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पार्थला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला एका काळ्या रंगाच्या गाडीत बसवून अज्ञातस्थळी नेले. तेथे त्याला एक तास मारहाण करण्यात आली.

पोलिसांना माहिती मिळाल्याने सुटका

दरम्यान, अपहरणकर्त्यांपैकी एकाला पोलिसांना अपहरणाची माहिती मिळाल्याचे समजले. त्यामुळे, त्यांनी पार्थला रेल्वेस्टेशन ब्रिजजवळ (Railway Station Bridge), हमालवाडा येथे सोडून दिले आणि ते पळून गेले. पार्थने घाबरून तेथून पळ काढत बालाजी स्वीट मार्ट गाठले आणि आईला फोन केला. त्याचे मामा सुरेश बाहुले पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी शनिवारी रात्रीच अनासला अटक केली, तर इतर पंधरा आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप बचाटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Title : Chhatrapati Sambhajinagar Student Kidnapped and Beaten for Inter-Religious Friendship 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .