राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!

Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांनी राज्याच्या राजकारणावर टीका केली आहे. महाराष्ट्रच राजकारण हे कारल्याच्या भाजीसारखं कडू झालं आहे असे म्हणत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

खुर्चीसाठी तुम्ही तिथे गेलात :

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जाहीर सभा घेतली आहे. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर देखील निशाणा साधला आहे.

यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आज राज्यात जे राजकारण सुरू आहे ते आजवर कधीही बघितलेले नाही. कारण राज्यात सध्या खोके व गद्दारी बेईमानी सुरु आहे. तसेच माझा शिवसेना पक्ष हा काँग्रेसशी कधीही युती करणार नाही असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलत होते. परंतु आता उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत कसे गेले? तर खुर्चीसाठी तुम्ही तिथे गेले. मग ही गद्दारी नाही का? असा सवाल देखील छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra l राज्याचं राजकारण हे कारल्याच्या भाजीसारखं कडू झालंय :

छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल 70 हजार कोटींचा आरोप करत होते. पण आज त्याच राष्ट्रवादी अजित पवारांसोबत त्यांनी महायुती तयार केली आहे.

याशिवाय सोनिया गांधी यांच्या परदेशीचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, नंतर पुन्हा ते त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे आता कारल्याच्या भाजीसारखे राजकारण कडू झालं असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी राज्यातील सर्वच पक्षांवर हल्ला चढवला आहे.

News Title –  chhatrapati sambhajiraje slams mahayuti and mahavikas aghadi

महत्त्वाच्या बातम्या-

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

‘गरिबांना पक्क घर देणार’; अकोल्याच्या सभेत PM मोदींची घोषणा

“अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली”; नव्या आरोपांनी खळबळ

सांगली हादरली! भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या

नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!