बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कोल्हापूर | आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. राज्यातील वातावरण आरक्षणावरून चांगलंच तापलं असल्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अशातच मराठा आरक्षणावर शाहू महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यांनी शाहू महाराजांची भेट कोल्हापूरमधील नवीन वाडा येथे झाली. त्यांच्यामधील बैठक जवळजवळ एक तास सुरू होती. त्यानंतर चर्चा झाल्यानंतर शाहू महाराजांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठा समाजाने स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. तसेच ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केला नाही, त्यांनी तो करणं गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करुन समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर न्यायालयाचा अवमान होता कामा नये याचीही काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आरक्षणाच्या सर्व गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली असून यासंबंधी सविस्तर माहिती अजित पवार देतील, असं शाहू छत्रपती महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारचे मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडेही लक्ष असून यापुढेही राहणार आहे. त्याचबरोबर आमच्यात आंदोलनाबाबत कोणती चर्चा झाली नसल्याचं शाहू महाराजांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील शाळा सुरू होणार?; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत

फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नाना पटोलेंनंतर काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा स्वबळाचा नारा

‘2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण…’; टास्क फोर्सच्या सदस्यांचा पालकांना मोलाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More