मुंबई | राज्यात सध्या धार्मिक मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण पेटलेलं पहायला मिळत आहे. अशातच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Shripal Sabnis) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणि ब्राम्हण यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत विभागणाऱ्या ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित इतिहासकारांना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी चांगलंच सुनावलं आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी. राजकारणात भ्रष्टाचार आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे. असं सबनीस यांनी म्हटलं आहे.
महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे, असंही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी म्हटलं आहे.
महाराजांच्या नावावर सुरू असलेल्या धार्मिक, राजकीय दुकानदारींवर सबनीस प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“पवार कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे…”
टेंशन वाढलं ! कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट, WHO म्हणाले…
“एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी शरद पवार जबाबदार”
राज ठाकरेंना धमकीचा फोन, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल
महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, राजेश टोपे ‘या’ कारणामुळे नाराज
Comments are closed.