देश

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात चौथऱ्यावरुन हटवला; सोशल मीडियावर संताप

बेळगाव | बेळगावातील एका गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सॅल्यूट…दुर्घटना होऊ नये म्हणून भर पावसात मॅनहोलजवळ तब्बल 5 तास उभी राहिली महिला, पाहा व्हिडीओ

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

इंदुरीकर प्रकरणात न्यायालयाने निभावली महत्त्वाची भूमिका…

कहाँ गये वो 20 लाख करोड?, पाच दिवसीय आंदोलनातून युवक काँग्रेस मागणार हिशोब

जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचं कोरोनाने निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.