महाराष्ट्र मुंबई

“शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून कर्नाटक सरकारने महाराजांचा पुतळा सन्मानाने बसवावा”

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच कर्नाटक सरकारने हटवला असल्याची घटना घडलीये. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र कर्नाटक सरकारने हा पुतळा हटवलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवल्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले. तसंच राजकीय वातावरण ही तापलं असल्याचं दिसून येतंय. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही तीव्र निषेध करत पुतळा परत बसवण्याची मागणी केलीये.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केलाय. चाकणकर म्हणतात, “बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणतीही पुर्वकल्पना न देता हटवला आहे. केवळ द्वेषाचं राजकारण करणार्‍या सरकारने हे निषेधार्ह कृत्य केलं आहे. जगभरातील शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून कर्नाटक सरकारने पुतळा पुन्हा मूळ जागी सन्मानाने बसवावा.”

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटलवल्याने संपूर्ण बेळगावसह महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळलीये. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. त्याचप्रमाणे शिवभक्त आणि राज्यातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा होत्या त्या जागेवर बसवण्याची मागणी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतच्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणं म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमान- संजय राऊत

व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा!

संरक्षण खातं बनणार आत्मनिर्भर; राजनाथ सिंह यांनी केली मोठी घोषणा…

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

‘या’ महिन्यापर्यंत फेसबुक कर्मचारी करू शकतात घरून काम, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या