Top News

छ. शिवरायांवरील पुस्तक मागे घेणार नाही, त्याचं…; उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर गोयल यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणाऱ्या वादग्रस्त पुस्तकावर शिवरायांचे वंशज आणि भाजप नेते उदजयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर पुस्तकाचे  पुनर्लेखन करणार असल्याचं पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जय भगवान गोयल यांनी म्हटलं आहे.

सत्तेसाठी शिवसेनेने शिवाजी महाराजांचे नाव वापरले आणि काॅंग्रेस सोबत गेली. मी तर शिवाजी महाराजांच्या गुणाबद्दल लिहलं आहे. उदयनराजे भोसले बोलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांच्या वंशजांनीच आता शिवसेनेची जागा दाखवली आहे, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

पुस्तकाचे पुनर्लेखन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाचण्यासाठी देणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचं नाव शिवसेनेऐवजी सोनियासेना असं करावं, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गोयल पुस्तक कसे मागं घेत नाही, हे मी बघतोच, असं म्हणत उदयनराजेंनी गोयल यांना इशारा दिला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक बातम्या-

पंतप्रधान मोदींच्या पुस्तकावर बंदी आणा; मराठा समाजाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

‘जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा पवारांना टोला

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या