Chhaava l सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्याची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिकेत आहेत.
विकी कौशलपूर्वी महेश बाबूला (Mahesh Babu) होती ऑफर :
चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या भूमिकेसाठी विकी कौशलऐवजी (Vicky Kaushal) एका दाक्षिणात्य सुपरस्टारची निवड करण्यात आली होती. हॉलिवूड सुपरस्टारने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटासाठी सुरुवातीला टॉलिवूडचा सुपरस्टार महेश बाबूला (Mahesh Babu) विचारणा करण्यात आली होती. मात्र, महेश बाबूने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी विकी कौशलला (Vicky Kaushal) ही भूमिका देऊ केली.
Chhaava l रश्मिका मंदानाऐवजी (Rashmika Mandanna) कतरिना कैफला (Katrina Kaif) होती पसंती :
‘छावा’ चित्रपटातील येसूबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) आधी अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) विचार करण्यात आला होता. परंतु, काही कारणांमुळे कतरिनाने (Katrina Kaif) या भूमिकेसाठी नकार दिला आणि त्यानंतर रश्मिकाची (Rashmika Mandanna) निवड करण्यात आली.
‘छावा’ चित्रपटातील कलाकार :
दिनेश विजन (Dinesh Vijan) निर्मित ‘छावा’ चित्रपटात विकी (Vicky) आणि रश्मिकाबरोबरच (Rashmika) अक्षय खन्ना (Akshay Khanna), आशुतोष राणा (Ashutosh Rana), दिव्या दत्ता (Divya Dutta), डायना पेंटी (Diana Penty), विनीत कुमार सिंग (Vineet Kumar Singh) यांसारखे हिंदीतील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर, या चित्रपटात संतोष जुवेकर (Santosh Juvekar), शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote), आशिष पाथोडे (Ashish Pathode), सारंग साठ्ये (Sarang Sathye), सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि नीलकांती पाटेकर (Neelakanti Patekar) यांसारखे अनेक मराठी कलाकारही आहेत.
‘छावा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी :
‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) आतापर्यंत सात चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘इमर्जन्सी’ (Emergency), जुनैद खानचा (Junaid Khan) ‘लवयापा’ (Loveyapa), हिमेश रेशमियाचा (Himesh Reshammiya) ‘बॅडएस रविकुमार’ (Badass Ravikumar), अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘आदाज'(Aadaj), अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘स्कायफोर्स’ (Skyforce) आणि शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘देवा’ (Deva) या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट 250 कोटींचा टप्पाही ओलांडू शकले नाहीत. मात्र, ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत 242.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने 300 कोटींचा आकडा पार केला आहे.