Top News महाराष्ट्र लातूर

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

लातूर |  मराठा आरक्षणावरून वातावरण तापाताना दिसत आहे. अशातच अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाला सरकार आतून विरोध करत असेल तर आम्ही मंत्रालयात घुसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत नानासाहेब जावळेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं.

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची रविवारी  राज्यव्यापी बैठक लातूरमध्ये पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्यावं, अशी  मागणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छावा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लढा उभारणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होती, मात्र ती तारीखही लांबली आहे. 8 ते 18 मार्च या काळात सुनावणी होणार आहे. 18 ला न्यायालय निर्णय देईपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करणार असल्याचं नानासाहेब जावळेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोदी

“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”

शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट, म्हणाली…

“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या