Chhaava l ‘छावा’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खेचत आहे, आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकीच्या (Vicky Kaushal) दमदार अभिनयामुळे चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, विकीची पत्नी, अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif), प्रयागराजमधील (Prayagraj) महाकुंभाला (Mahakumbh) भेट देण्यासाठी गेली.
कतरिना कैफची महाकुंभ भेट :
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी विकीने (Vicky Kaushal) प्रयागराजमधील (Prayagraj) महाकुंभाला (Mahakumbh) भेट देऊन संगमावर स्नान केले होते. आता चित्रपटाच्या यशानंतर, कतरिना कैफ (Katrina Kaif) आपल्या सासूसोबत महाकुंभाला (Mahakumbh) पोहोचली. कतरिनाने यावेळी पारंपरिक पंजाबी सूट परिधान केला होता, तर तिच्या सासूनेसुद्धा तसाच पोशाख परिधान केला होता.
संगमात स्नान करण्यापूर्वी, कतरिना आणि तिच्या सासूने तेथील ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले. फुलांचा वर्षाव करून आणि गळ्यात हार घालून कतरिनाचे स्वागत करण्यात आले. तेथील साधूंनीही तिच्याशी संवाद साधला. कतरिना अनेकदा आपल्या कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना भेटी देत असते, काही दिवसांपूर्वीच ती शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेली होती.
Chhaava l ‘छावा’ चित्रपटाची यशोगाथा :
‘छावा’ चित्रपटाच्या प्रीमियरला विकी (Vicky Kaushal) आपल्या कुटुंबासोबत उपस्थित होता. चित्रपट पाहून त्याचे आई-वडील खूप आनंदित झाले होते. कतरिनाने (Katrina Kaif) सुद्धा विकीच्या (Vicky Kaushal) अभिनयाची स्तुती केली. तिने सोशल मीडियावर लिहिले की, “छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या चित्रपटात खूप सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.”
तिने पुढे असेही लिहिले की, ” लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी कथा खूप छान सादर केली आहे. चित्रपटाचा शेवटचा भाग पाहून मी थक्क झाले. विकी कौशल (Vicky Kaushal), तू खरंच एक अप्रतिम कलाकार आहेस आणि तुझा अभिनय मनाला भिडणारा आहे.” ‘छावा’ चित्रपटाने 300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), अक्षय खन्ना (Akshay Khanna), आशुतोष राणा (Ashutosh Rana), संतोष जुवेकर (Santosh Juvekar), दिव्या दत्ता (Divya Dutta) आणि विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
✨ Katrina Kaif at Mahakumbh ✨
Katrina Kaif visits Parmarth Niketan in Prayagraj, meeting @PujyaSwamiji & @SadhviBhagawati Ji. 🌸 Her presence at #mahakumbhmela blends spirituality with entertainment, inspiring youth to reconnect with their roots. 🌺#Mahakumbh #KatrinaKaif pic.twitter.com/FBdSX1Sxtj— Parmarth Niketan (@ParmarthNiketan) February 24, 2025