Chhaya Kadam | अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) ही नेहमी चर्चेत असते. मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटात तिने एका दलित महिलेची भूमिका केली होती. त्यानंतर तिने सैराट या चित्रपटामध्ये काम केलं. तिच्या अभिनयाने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. तिने मडगाव एक्सप्रेस आणि लापता लेडिज या सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे छाया कदम (Chhaya Kadam) चर्चेत आली.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली शेअर :
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका सिनेमाच्या प्रमिअर सोहळ्याला तिने हजेरी लावली होती. ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमाचा प्रिमियर सोहळा होणार असून तिने चित्रपटाच्या प्रमियरला आपली उपस्थिती दर्शवली होती. याच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. सध्या त्या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ सिनेमात छाया कदमने चांगली आणि महत्त्वाची भूमिका चोख बजावली आहे. काही दिवसांआधी तिने एअरपोर्टवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती समोर आली. त्यावर तिने चलो कान्स अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
काय होती पोस्ट? :
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने फोटोमध्ये आपल्या आईबाबतची भावना व्यक्त केली आहे. त्या पोस्टमध्ये आपल्या आईची साडी आणि नथ परिधान केल्याची माहिती तिने दिली असून अभिनेत्रीने आपल्या आईबाबत मनातील सल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
“आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. …पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू”, अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
छाया कदम यांचे सिनेमे
सध्याच्या घडीत अभिनेत्री छाया कदमच्या (Chhaya Kadam) अभिनयाची तुलना ही इतर कोणत्याच अभिनेत्रीशी होऊ शकत नाही असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. कारण छाया कदम (Chhaya Kadam) अभिनय क्षेत्रातील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. सुरूवातीला फॅन्ड्री, सैराट, न्यूड, सरला एक कोटी, तर बॉलिवूडमध्ये तिने झुंडसारख्या सिनेमात काम केलं आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमात तिने वैश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका केली होती. तर मडगाव एक्सप्रेस, लापता लेडीमध्ये काम केलं आहे.
News Title – Chhaya Kadam Marathi Actress Share Post For Her Mother Entertainment News
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल
‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत
‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा
‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं