नाशिक | महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नका, असं पत्र राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तसंच पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क आहे, तो अबाधित ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नार, पार, औरंगा, अंबिका खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यात वळविण्याकरिता नार-पार-गिरणा उपसा जोड योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, तो तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आहे, असंही त्यांनी पत्रात लिहलं आहे.
पार-तापी-नर्मदेचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे शासनाकडून सांगितले जाते मात्र या प्रकल्पाचा महाराष्ट्राला काहीही फायदा नाही, असंही त्यांनी सांगितलय.
महत्त्वाच्या बातम्या–
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी