मुंबई | देशात तसंच महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अनेक मजूर राज्यातल्या विविध भागात अडकले आहेत. गाड्या सुरू होण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत. अशा परिस्थितीत घरात खायला देखील काही उरलं नाही. मग आपल्या लेकराबाळांना आणि बायकापोरांना घेऊन मजुरांचे जथ्येच्या जथ्ये रस्त्याने निघाले आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या मजुरांना गावाकडे पोहचण्याचा ध्यास आहे. या सगळ्या मन विषण्ण करणाऱ्या परिस्थितीवर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
स्थलांतरितांचे जथ्येच्या जथ्ये रोडवरून गावाकडे जायला निघाले आहेत, हे सरकारला अशोभणीय आहे, असं परखड मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर नाराजी दर्शवली आहे.
मजुरांचे घोळके ज्यावेळी रस्त्याने चालत आहेत, ते चित्र मला बघवत नाही. मन अगदी विषण्ण होऊन जातं. या विषयाला मी कॅबीनेट बैठकीत वाचा फोडली आहे. यावर लवकरात लवकर पावलं उचलली जावीत, यासंबंधी चर्चा झाली असल्याचं भुजबळांनी सांगितलं.
सरकार सतत बदलत असलेल्या नियमांमुळे लोकांमध्ये संभ्रम होत आहे. हा संभ्रम दूर करणे हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये योग्य संवाद करून येणाऱ्या काळात नागरिकांमध्ये संभ्रम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा शब्दही भुजबळ यांनी दिला.
दरम्यान, संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. मला कुणावरही टीका करायची नाही. माझा टीकेचा हेतू नाही परंतू सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, अस ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी सोडण्यासाठी एस.टी. धावणार- परिवहनमंत्री
महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी कालच्या प्रकारावर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी- संभाजीराजे
“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”
फडणवीसांचं शाहू राजांवर वादग्रस्त ट्विट; छत्रपती संभाजीराजे म्हणतात…
Comments are closed.