बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाच वर्षात कामं केली असती, तर आंदोलनाची वेळ आली नसती- छगन भुजबळ

मुंबई | भाजपने पाच वर्षात कामं केली असती तर आज त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली नसती, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोकशाही असल्याने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आम्ही पंकजा मुंडे यांच्या आंदोलनाकडे सकारत्मकतेने पाहतो. काही अडचण असल्यानेच त्या सत्यागृह करत असतील. मात्र, आंदोलन करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येत काम करायला हवं, असं भुजबळ म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन अवघे दोन महिने झाले आहेत. त्यामुळे इतक्या लवकर सरकारकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करणार नाही. कारण या सरकारला येऊन जेमतेम 100 दिवस झाले आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

टेंडिंग बातम्या-

मला हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधू नका; राज ठाकरेंच्या सूचना

“हवं तर क्रेडिट घ्या, योजनांचे नावही बदला, पण मराठवाड्यावर अन्याय करु नका”

महत्वाच्या बातम्या-

यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार- पंकजा मुंडे

अरे बाबा थांब…नाही तर एखादा पैलवान आपल्याला चितपट करेल- अजित पवार

इतिहास अमित शहांसारख्या जनावरावर थुंकेल; अनुराग कश्यपची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More