छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे; थकीत वीजबिलं न भरण्याचं आवाहन

नाशिक | पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची पीके वाया गेली आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले भरू नयेत, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

अपुऱ्या पावसामुळे चारा टंचाईची समस्या सुद्धा जाणवू लागली आहे. तसंच डीपी फेल झाल्यानंतर वीजबील भरण्याची सक्ती केली जात आहे, त्यामुळे कोणीही वीजबील भरू नये, असं भुजबळांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भुजबळांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं असून सरकारने अशी सक्ती करू नये, तसंच दुष्काळी भागासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-संभाजी भिडे हाजीर हो…

-छगन भुजबळ मैदानात; बीडमध्ये धडाडणार भुजबळांची तोफ!

-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मागणी

-मोदींनी जनतेचा पैसा चोरलाय- राहुल गांधी

-16व्या वर्षीच प्रियकराकडून बलात्कार; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या