बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

अहमदनगर | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. श्रीपाद छिंदमला अहमदनगरच्या तोफखाणा पोलिसांनी अटक केली आहे. श्रीपाद छिंदम आणि त्याच्या भावाला उच्च न्यायालयानं दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे छिंदम भावांना अटक करण्यात आली आहे.

छिंदम भावांनी दिल्लीगेट येथील ज्युस सेंटर चालक बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. भगीरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून नगरच्या तोफखाना पोलिसांत छिंदम आणि त्याचा भाऊ महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांच्यासह अन्य 30 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर छिंदम भावांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. ही सर्व घटना 9 जुलै 2021 ला घडली होती.

अहमदनगरचा भाजपचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमने तीन वर्षापुर्वी नगर मनपाच्या कर्मचाऱ्याला छत्रपती शिवरायांबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. तीन वर्षापुर्वी राज्यात या घटनेमुळं तीव्र संतापाची लाट तयार होत पडसाद उमटले होते. त्यानंतर त्याची उपमहापौर पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

दरम्यान, श्रीपाद छिंदम अहमदनगर मनपा निवडणुकीत अपक्ष उभा राहत त्याने या निवडणुकीत विजय मिळवला होता. जिंकल्यानंतर श्रीपाद छिंदमने शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रायश्चित करण्याचा प्रयत्न केला होतं.

थोडक्यात बातम्या –

भारताचा कधीही अफगाणिस्तान होणार नाही, हिंदू जगातील सर्वात…’; जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More