बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘छोटा राजन जिवंत आहे’; AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

नवी दिल्ली | अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती चुकीची असून राजनवर उपचार सुरू आहेत, असा खुलासा AIIMS च्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

छोटा राजन करोना संक्रमित असल्याचं समोर आल्यानंतर त्याला उपचारासाठी २६ एप्रिल रोजी दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

थोडक्यात बातम्या- 

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

पुण्यातील लॉकडाउनबाब अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं, तेही आघाडीला टिकवता आलं नाही”

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

“मराठा समाजाने आता आंदोलन नाही, लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More