बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

नवी दिल्ली | सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी ज्युलियस स्टोनचे उदाहरण देत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यकर्ते बदलून अत्याचारापासून मुक्ती मिळू शकत नाही. निवडणुका, टीका आणि निषेध हे सर्व लोकशाहीचा भाग आहेत पण दडपशाहीपासून मुक्तीची हमी मिळत ​​नाही, असं एन.व्ही. रमण यांनी म्हटलंय.  ते एका कार्यक्रमात बोलत होते.

सरकार बदलण्याचा तुम्हाला हक्क असू शकतो, परंतु यामुळे तुम्हाला छळापासून मुक्त होण्याची हमी मिळत नाही. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान जपला जात नाही तोपर्यंत लोकशाहीचा अर्थ पूर्ण होत नाही, असं एन.व्ही. रमण म्हणालेत.

न्यायपालिकेवर कोणत्याही विधानसभा किंवा कार्यकारिणीद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवले जाऊ नये. असं झाल्यास नियम व कायदे गौण होतील. त्याचप्रमाणे जनतेच्या मतांचा संदर्भ देऊन किंवा भावनिक दृष्टीकोन देऊन न्यायाधीशांना कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली आणू नये, असंही एन.व्ही. रमण यांनी म्हटलं आहे.

न्यायाधीशांना हे माहित असलं पाहिजे की सोशल मीडियावर गोष्टींची अतिशयोक्ती केली जात आहे, महत्वाचं नाही हे पुर्ण खरं असेल आणि ते पूर्णपणे खोटं असेल असंही नाही, असं एन.व्ही. रमण म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

लोकांना लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी मंत्र्यांनी रांगेत उभं रहावं- नरेंद्र मोदी

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा काच शिल्लक ठेवणार नाही”

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More