बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुंबईतील भांडुपमधील ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत कोविड सेंटरही जळून खाक झालं आहे. या आगीमध्ये 10 जणांना आपला प्राण गमवावा लागला. यावरून विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेला जबाबदार धरत त्यांच्यावर टीका केली आहे. घटनास्थळी जाऊन देंवेंद्र फडणवीस यां पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भंडाऱ्यात नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटलमध्ये फायर ऑडीटचे आदेश दिले होेते. मग इथे फायर ऑडीट का झालं नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. या इमारतीला ओसी नसताना इथे कोविड सेंटर सुरूच कसं करण्यात आलं?, असाही सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

या इमारतीतून बचाव करण्यासाठी रेस्क्यूचा पर्यायही धड नव्हता. त्यामुळे रुग्णांनाही स्वत:चा जीव वाचवता आला नाही आणि अग्निशमन दलालाही बचावकार्यात अडथळे आले. त्यामुळे एकंदरीतच याला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीप्रकरणी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराने पोखरून गेली असल्याचं फडणवीस म्हणाले. यावरून मनेसे नेते संदीप देशपांडे यांनीसुद्धा टीका केली आहे.

दरम्यान, बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता?, असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. तसेच कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल देशपांडेंनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मी लस घेतली पण फोटो काढून नौटंकी करायला मला आवडत नाही- अजित पवार

‘नवनीत राणा यांनी वेळीच आवाज उठवला असता तर…’; महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून रूपाली चाकणकर आक्रमक

“बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात कुणाचा फायदा होता?”

आशियातला सगळ्यात मोठा मॉल, मात्र सुरुच झाला नाही; आग लागलेल्या मॉलबद्दल आणखी धक्कादायक गोष्टी समोर

‘दिपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर…’; चित्रा वाघ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More