मॉलमधील आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले…
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भांडूपमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
सनराईस रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या रुग्णालयात काही लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यांचाच या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला आहे. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याचा निर्णय घेणं कठिण असतं. मात्र, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.
कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर कोविड सेंटर, रुग्णालये ज्या इमारतीत आहेत, त्या संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
वनअधिकारी दिपाली चव्हाणांची मन सुन्न करणारी सुसाईट नोट आली समोर!
‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा कॉलेज बंद राहणार- अजित पवार
UPSC चा सावळा गोंधळ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘त्या’ पत्रामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका
अजित पवारांचा पुणेकरांना अल्टीमेटम; लॉकडाऊनसंदर्भात केलं मोठं वक्तव्य
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.