बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | कोरोनानं (Corona) जगभरात कहर माजवला आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या, असं ट्विट करत त्यांनी कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढत होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅननं राज्यात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

‘नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय’; शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

‘या’ गोष्टीचा सनी लिओनीला आजही होतो त्रास, स्वत: केला खुलासा

समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More