मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हि़डीओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या लसीची मागणी केली. त्याच बरोबर कोविडविरोधातल्या लढ्यात राजकारण आणू नये. सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी मोदींंना सांगितलं.
केंद्राने जादा 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत, राज्याला लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे. एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. तसेच २५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमिडेसेवीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावं. रेमिडेसेवीरचा अती व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयसीएमआरला केली आहे.
हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं असलं तरी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाचं मत आहे. राज्यात एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के अँटीजेन होतात जे समाधानकरक असलं तरी वाढवायला हवं, असं केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!
अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड
रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.