बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी सहायक पोलीस सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. याच प्रकरणावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हे भयावह आहे, पोलीस आयुक्त झालेले अधिकारी, महासंचालक स्थरावरचा अधिकारी, गृहमंत्र्यांचं नाव घेऊन सांगतो तो सरळसरळ गृहमंत्र्यांवर आरोप करतोय. गृहमंत्र्यांनी सांगितलेलं काम सचिन वाझे करत होते, असं राणे यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या 100 कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे, अशी भूमिका राणे यांनी मांडली.

दरम्यान, महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतोय. कायदा आणि सुव्यवस्था नाही. विकास ठप्प झालायं. पोलीसच गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी माझी अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती, असंही नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी- अमृता फडणवीस

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…

‘अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले होते’; माजी मुंबई पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More